माझी दिवाळी : मधुरा गोडबोले

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

दिवाळी हा असा एक सण आहे कि ज्यावेळी मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना भेटते. एरवी कामानिमित्त मी दिवसभर बाहेर असते त्यामुळे कितीही वाटलं तरीही माझ्या जवळच्या लोकांना – नातेवाईकांना मला वेळ देता येत नाही. त्यामुळे हा सण म्हणजे माझ्यासाठी एक सोहळा असतो ज्यात मला माझ्या जवळचे सगळेच भेटतात.  या दिवसात मी व्यावसायिक काम बंद ठेवते. दिवाळी पहाट हि ठाणेकरांसाठी नेहमीच विशेष अशी असते. यादिवशी सकाळी लवकर राम मारुती रोडला फेरफटका मारायचा. सगळ्या मित्र – मैत्रिणींना भेटायचं. शुभेच्छांची घेवाण देवाण करायची हे सगळं न चुकलेलं. आणि या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन नंतर मस्त मिसळ पाववर ताव मारायचा, हा माझा त्या दिवसाचा दिनक्रम. 

आमचा परिवार खूप मोठा आहे. यात भाऊमंडळीदेखील खूप आहेत आणि म्हणून भाऊबीज हि माझ्यासाठी एक दिवसाची कधीच नसते. मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे या सगळ्या ठिकाणी जायचं. भावांना भेटायचं आणि जाताना रोज नवी साडी, वेगळा पेहराव, त्याची तयारी असं सगळं सुरु असत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून पूजा करायची. या सगळ्या सोहळ्याच्या जोडीने सामाजिक बांधिलकी म्हणून मी दरवर्षी पणत्या रंगवून त्या विक्रीसाठी तयार करते. यातून जे पैसे येतात ते आम्ही सगळे एका ट्रस्टला देतो. त्यामुळे दिवाळी हा सण नाही तर खऱ्या अर्थाने सोहळाच असतो माझ्यासाठी.


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *