महाबली हनुमान २३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर

सोनी मराठी नवनवीन मालिका सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे . २३ ऑगस्टपासून सुरू…

मंजु – शौनकच्या आयुष्याला लागणार नवं वळण

मंजु-शौनकच्या प्रेमाचा अंकुर फुलणार इतक्यात त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली आणि या नात्यात दरी निर्माण…

ह.म.बने तु.म.बने परिवार निघालयं वारीला बने परिवारही लुटणार वारीची मजा

अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या…

‘जुळता जुळता जुळतंय की’च्या एक तासाच्या विशेष भागात असणार शेफ विष्णु मनोहर यांच्या स्पेशल रेसिपीज

आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष  ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे. ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत. “अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले. अपूर्वाने बनवलेल्या  स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची  खास रेसिपी आणि अपूर्वा-विजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.

फेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग

मंजू–शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूला घरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरू आहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू–शौनकच्या पाठी पडली आहेत. “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर“, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजू आपलं शिक्षणाचं स्वप्न कसं काय पूर्ण करणार? यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार? देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणार आहेत प्रेमाचा महिना समजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये… फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात. या प्रेमा  महिन्यात मंजू–शौनकचं प्रेम कितीसं बहरतं आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा, एक तासाचे हे विशेष भाग, तुमच्या लाडक्या सोनी मराठीवर.

स्वतःवरच उलटला मयुरीचा कट

सेटवर कलाकारांचा नेहमीच कल्ला सुरु असतो. अनेक धमाल किस्से घडत असतात. असाच एक मजेशीर किस्सा ‘प्रेमवारी’च्या…