माझी दिवाळी : मोनालिसा बागल

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे मी बाहेर पडते आणि माझ्या जवळच्या मित्र – मैत्रिणींना भेटते. तर सारसबागला देखील जाऊन दिवाळी पहाट साजरी करते. दिवाळीचा फराळ हा मला खूप आवडतो. परंतु शरीराच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या आहाराच्या घटकांमुळे फराळ हा खूप आवडत असूनही वर्षभर मी तो खायचा टाळते. मात्र दिवाळीला हि बंधन झुगारून त्याचा मनमुराद आनंद मी लुटते. चकली आणि लाडू हे दोन्हीही मला फार प्रिय असल्याने त्याच सेवन या दिवसांत अधिक होत.

दिवाळीत रांगोळी काढायचा छंद मला खूप आधीपासून आहे. मी काढलेल्या रांगोळीच कौतुक जेव्हा नातेवाईक वा जवळचे करतात तेव्हा एक वेगळाच आनंद त्या कलेतून मला मिळतो. आमच्या परिवारात दिवाळीला फक्त नऊवारी नेसण्याची प्रथा आहे आणि ती मी जपली आहे. लक्षमीपूजनाला नऊवारी नेसून त्यासाठी पारंपरिक पेहराव करणं ही माझ्यासाठी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. मला भाऊ नाही. मात्र आम्ही दोघी सख्ख्या बहिणी हा भाऊबीजेचा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मी आणि माझी बहीण – अश्विनी आम्ही दोघेही एकमेकांना ओवाळून आणि एकमेकांना गिफ्ट्स घेऊन हा दिवस साजरा करतो.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *