बने कुटूंबात येणार खास पाहुणा

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

तृतीयपंथी ” कलाकारांची अनोखी गोष्ट !

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात  तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी  सोनी मराठी वरील ” ह.म.बने. तु.म.बने ” ही मालिका अग्रगण्य आहे .  समाजात घडणारे अनेक विषय योग्य प्रकारे हाताळून लोकांना या  मालिकेतून सामाजिक संदेश देण्यासाठी ही मालिका नेहमी काही न काही नव्या गोष्टी  लोकांसमोर घेऊन येते . लवकरचं या मालिकेत एक खास आणि कमालीचा विषय मांडण्यात येणार असून या मालिकेच्या माध्यमातून  खरा खुरा  तृतीयपंथी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे .

” ह.म.बने.तु.म.बने ” ही मालिका नेहमीच अश्या अनोख्या विषयामुळे चर्चेत आहे .बने कुटूंबीय नेहमीच आपल्याला त्यांच्या कमालीच्या भूमिका मधून  भेटीला येत असतात आता असा काहीसा अनोखा विषय या मालिकेत लवकरचं आपल्याला बघायला मिळणार आहे .  आजवर आपण अनेक चित्रपटात आणि वेबसेरीज मध्ये तृतीयपंथीना बघत आलो आहोत  तर आजवर कुठल्या ही मालिकेत किंवा चित्रपटात खऱ्या तृतीयपंथीय माणसाने काम केलं नसून लवकरचं आपल्याला एक खरा खुरा तृतीयपंथी या  मालिकेत काम करताना दिसणार आहे . समाजातील एक अनोखा घटक म्हणून तृतीयपंथी लोकांकडे पाहिलं जातं .  तर  नेहमीच वेगळ्या विषयांना कल्पक रीतीने मांडून   त्यांकडे वेगळ्या  दृष्टिकोनातून भाष्य करणारी मालिका म्हणजे ” ह.म.बने. तु.म.बने ”

.  या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीयला  मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे . मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? या नव्या कलाकारांला बघण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ना मग  हे बघण्यासाठी येत्या  २० नोव्हेंबर रोजी ह.म.बने.तु. म.बने पाहायला विसरू नका  फक्त सोनी मराठीवर .

” .  या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीयला  मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे .  मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? या नव्या कलाकारांला बघण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ना मग  हे बघण्यासाठी येत्या  २० नोव्हेंबर रोजी ह.म.बने.तु. म.बने पाहायला विसरू नका  फक्त सोनी मराठीवर .


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *