सुव्रत झाला “गुलाम जोरू का”

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाच्या अफलातून ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील ‘जोरू का गुलाम’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. सुव्रत, प्राजक्ता यांच्या सोबत गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन हे सुद्धा या गाण्यात दिसत आहेत. लग्न ठरल्यानंतर त्याचे तोटे काय काय आहेत हे सुव्रतला त्याचे मित्र सांगत आहेत. म्हणून ते सुव्रतला  ” तू नही तेरी मर्जी का मालिक तू गुलाम तेरी जोरू का”  असे म्हणत चिडवत आहेत.  या हटके गाण्याच्या शब्दांवरून  सुव्रत प्राजक्ता याचे लग्न ठरलेले असावे असे वाटते.  आणि म्हणूनच  सुव्रतला  मित्र अशा अनोख्या पद्धतीने  चिडवताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला दाक्षिणात्य संगीत ऐकू येते. दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीय या दोन्ही संगीताचा अप्रतिम मेळ, हे गाणे ऐकताना जाणवतो.  ह्या गाण्याचे शूटिंग रात्री करण्यात आले. शूट चालू असताना खूप थंडी असायची. या  गाण्यात गणेश पंडित हे नाचताना स्विमिंग पूल मध्ये पडतात. असे एक दृश्य आहे. आणि गाण्याचे शूटिंग संपेपर्यंत त्यांना ओलेच राहावे लागे. शूट संपले, की ते लगेच दोन दोन ब्लॅंकेट घेऊन बसायाचे. जोपर्यंत गाणे पूर्ण चित्रित होत नाही,  तोपर्यंत किंबहुना तेवढ्या शूटिंगच्या रात्री त्यांना ओले राहावे लागत होते. पण तरीही त्यांनी हे शूटिंग पूर्ण केले, तेही फुल्ल धमाल मजा, मस्ती  करत. या गाण्यात एक सरप्राइज म्हणजे या चित्रपटाचे निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा या गाण्यात ठेका धरला आहे.  गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवरच चित्रपटाचे दिग्दर्शक शिवकुमार यांनी उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांना या गाण्यात डान्स करण्याची विनंती केली. ऐनवेळी केलेली ही विनंती उत्तुंग यांनी तितक्याच आनंदाने मान्य करत अवघ्या  २० मिनिटात गाण्याच्या डान्स स्टेप शिकून सर्व कलाकारांसोबत तालावर ताल धरला. आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला एक सुखद धक्का दिला.      गुरु ठाकूर यांच्या मार्मिक अशा शब्दांना  मराठी आणि दक्षिण भारतीय मिक्स असे संगीत श्रीकांत आणि अनिता या नवोदित संगीतकार जोडीने दिले आहे. खरे पहिले तर गाणे ऐकल्यावर वाटणारच नाही की संगीतकार हे नवीन आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या संगीताला कैलाश खेर यांच्या दमदार आवाजाची जोड मिळाल्याने गाण्याची मजा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचते. फुलवा खामकर यांनी या गाण्याचे सुंदर असे नृत्यदिग्दर्शन केले आहे.   या चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. तर या चित्रपटाची निर्माती उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *