‘गर्ल्स’मध्ये झळकणार ‘हा’ चेहरा!

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून  हा चित्रपट मुलींच्या…

सोनी मराठीवरून सुबोध भावे घडवणार लोककलांनी समृध्द महाराष्ट्राचं दर्शन

सोनी मराठी एका पाठोपाठ एक कमाल कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांसमोर पेश करत आहे. २ डिसेंबरपासून सुरू होणारा लोककलांवर आधारित “जय जय महाराष्ट्र माझा” यापैकीच एक. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. . पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जपल्या जाणार्‍या लोककला नव्याने जिवंत करण्याचा सोनी मराठीचा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे लोककलांचं ज्ञान असणारा अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहीरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शकुताई नगरकर, शाहीर अमर शेखांची परंपरा चालवणारे निशांत शेखसारखे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत. २ डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार असून पुढे आदर्श शिंदे, नंदेश उमप, कार्तिकी गायकवाड, प्रसनजीत कोसंबीसारखी मंडळी आपल्या लोककलांचा वारसा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील लोककलांच्या उत्सवात तुम्हीही सहभागी व्हा २ डिसेंबरपासून सोम. आणि मंगळ. रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

‘सिनिअर सिटिझन’चे ‘किलर’ सॉन्ग आऊट

         अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘सिनिअर सिटीझन’ या…

सई आणि नीना कुळकर्णी दिसणार मायलेकीच्या भूमिकेत

एक स्त्रीच दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहिण असू शकते…

GIRLZ – गर्ल्स’च्या छबीला मिळणार हजारो ‘लाईक्स’

 प्रदर्शनापूर्वीच ‘गर्ल्स’ चित्रपटाचा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेण्डिंगमध्ये असतानाच आता या सिनेमाची…

ZOL ZAAL : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘झोल झाल’

मराठी सिनेसृष्टीत अनेक मजेदार, विनोदी चित्रपट येत आहेत. यात आणखी भर टाकत, पुढील वर्षात प्रेक्षकांना खळखळून…

सायली सांगणार ‘गोष्ट एका पैठणीची’

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी. पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची…

स्वराज्यजननी जिजामाता मालिका आता पुढच्या टप्प्यात

सरदारांची वर्दळ, युध्दाचे डावपेच, सल्लामसलत, न्यायनिवाड्यात जाणारा दिवस तर युध्दकलांचं प्रशिक्षण अशा वातावरणात पार पडलेलं जिजाचं बालपण. पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना बालपणीच असह्य झालेल्या जिजांनी  मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात  स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं  कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या  कटिबध्द  ही होत्या . त्यांच्या  पोटी जन्माला आलेल्या शिवबाला युध्दकलेत पारंगत करणं असेल किंवा स्त्रियांचा सन्मान, इतकंच नव्हे तर जाती – धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर जिजाऊने केले. शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार  पाडतानाच  जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी चोख पणे  पार  पाडलं. शिवबानं बरोबरच अवघ्या मराठी  मुलखाचे भविष्य घडवणाऱ्या  अशा थोर माऊलीची गाथा सध्या सोनी मराठीच्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेच्या माध्यमातून समोर आलेलं जिजाऊचं हे कणखर व्यक्तिमत्त्व आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. जिजाऊ च्या बालपणा पासून ते आताच्या  कणखर धैर्यशाली जिजाऊ यांचा हा अनोखा प्रवास ” स्वराज्यरजननी  जिजामाता ” या मालिकेतून आपल्या समोर उलगडणार आहे . बालपणीच जिजाऊ च्या   मनी रोवलं गेलेलं स्वराज्याचं बीज मूर्तरूपात पाहण्यासाठी तिची धडपड डॉ अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जिजा-शहाजीचं बालपण आता सरलं असून मोठ्या जिजाची भूमिका आता अमृता पवार या मालिकेत साकारत आहे. तर  शहाजींच्या भूमिकेत अभिनेता रोशन मनोहर विचारे दिसणार आहे.    जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श ठेवावा अशा मुलखावेगळ्या आईची गाथा, “स्वराज्यजननी जिजामाता” नव्या स्वरूपात पाहायला विसरू नका २५ नोव्हेंबरपासून सोम. ते शनि. रा. ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

सेलिना जेटलीबरोबर काम करणे हा एक उत्तम अनुभव: अझर खान

मॉडेल अझर खान एक बॉलिवूडचा नवा चेहरा बनणार आहे. यासाली अझर डेब्यू युवा कलाकारांपैकी एक असणार…

बने कुटूंबात येणार खास पाहुणा

तृतीयपंथी ” कलाकारांची अनोखी गोष्ट ! टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात  तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी  सोनी मराठी वरील ” ह.म.बने. तु.म.बने ” ही मालिका अग्रगण्य आहे .  समाजात घडणारे अनेक विषय योग्य प्रकारे हाताळून लोकांना या  मालिकेतून सामाजिक संदेश देण्यासाठी ही मालिका नेहमी काही न काही नव्या गोष्टी  लोकांसमोर घेऊन येते . लवकरचं या मालिकेत एक खास आणि कमालीचा विषय मांडण्यात येणार असून या मालिकेच्या माध्यमातून  खरा खुरा  तृतीयपंथी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे . ” ह.म.बने.तु.म.बने ” ही मालिका नेहमीच अश्या अनोख्या विषयामुळे चर्चेत आहे .बने कुटूंबीय नेहमीच आपल्याला त्यांच्या कमालीच्या भूमिका मधून  भेटीला येत असतात आता असा काहीसा अनोखा विषय या मालिकेत लवकरचं आपल्याला बघायला मिळणार आहे .  आजवर आपण अनेक चित्रपटात आणि वेबसेरीज मध्ये तृतीयपंथीना बघत आलो आहोत  तर आजवर कुठल्या ही मालिकेत किंवा चित्रपटात खऱ्या तृतीयपंथीय माणसाने काम केलं नसून लवकरचं आपल्याला एक खरा खुरा तृतीयपंथी या  मालिकेत काम करताना दिसणार आहे . समाजातील एक अनोखा घटक म्हणून तृतीयपंथी लोकांकडे पाहिलं जातं .  तर  नेहमीच वेगळ्या विषयांना कल्पक रीतीने मांडून   त्यांकडे वेगळ्या  दृष्टिकोनातून भाष्य करणारी मालिका म्हणजे ” ह.म.बने. तु.म.बने ” .  या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीयला  मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे . मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? या नव्या कलाकारांला बघण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ना मग  हे बघण्यासाठी येत्या  २० नोव्हेंबर रोजी ह.म.बने.तु. म.बने पाहायला विसरू नका  फक्त सोनी मराठीवर . ” .  या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीयला  मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे .  मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? या नव्या कलाकारांला बघण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ना मग  हे बघण्यासाठी येत्या  २० नोव्हेंबर रोजी ह.म.बने.तु. म.बने पाहायला विसरू नका  फक्त सोनी मराठीवर .