माझी दिवाळी : अक्षया हिंदळकर

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिवाळी हा सणच वेगळी सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. सगळीकडे असलेली विद्युत रोषणाई, दिव्यांचा झगमगाट या सगळ्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण असत. मला स्वयंपाकाची वेगळी आवड आहे. मी त्याच शास्त्रोक्त शिक्षण देखील घेतलं आहे. त्यामुळे दिवाळीचा सण म्हणजे माझ्यासाठी खवय्येगिरी करण्याची संधीच असते. मी स्वतः सगळा फराळ करते. चकली, अनारसे, लाडू, करंजी इतकंच नाही तर जेवण देखील करते.
दिवाळीच्या आदल्या दिवशी मी आणि माझी बहीण मनसोक्त खरेदीला बाहेर जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाहेर न जाता तो संपूर्ण दिवस माझ्या परिवारासोबत आणि काही नातेवाईकांसोबत घालवते. मला भाऊ नाही. मात्र लहान बहीण आहे. त्यामुळे भाऊबीजेला बहिणीला – वैष्णवीला ओवाळते. तिला गिफ्ट देणं आणि संपूर्ण दिवस साजरा करण हे आमचं दरवर्षी ठरलेलं असत.
यावर्षी माझी दिवाळी घरच्यांसोबत नसेल. स्टार प्रवाह चॅनेलवर माझी नुकतीच सुरु झालेली साता जल्माच्या गाठी या मालिकेमुळे मी दिवाळीतले सर्व दिवस सेटवर असेन. सेट म्हणजे माझं दुसरं घर आहे. खूप कमी दिवसात माझा एक परिवाराचं इथे तयार झाला आहे. त्यामुळे या माझ्या लोकांसोबत यंदाची दिवाळी मी साजरी करेन याचा वेगळा आनंद मला आहे. आपुलकीने बोलणारी, काळजी घेणारी ही स्टार प्रवाह चॅनेलची टीम असल्याने इथे मी तितकीच रमते. यंदाची दिवाळी या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात एक वेगळा आनंद घेऊन आली आहे, हे नक्की.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *