माझी दिवाळी : अमृता फडके

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठून माझ्या लोकांमध्ये राहून हा दिवस साजरा करते. मला फार गर्दी आवडत नाही म्हणून मी शक्यतो बाहेर जाणं टाळते. लक्षमीपूजनाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करण, त्याला साजेसा शृंगार करून देवी – देवतांची पूजा करण, हे लहानपणापासून न चुकता मी करते. तसेच फुलांची रांगोळी काढणं हा देखील दिवाळीतला माझा आवडता छंद. या सणानिमित्त मी फराळ स्वतः तयार करते. मला फराळ तयार करायला जितका आवडतो तितका उत्साह तो खाण्याच्या बाबतीत माझा नसतो. मला फार गोड आवडत नाही. मात्र फराळापैकी ओल्या नारळाच्या करंज्या मी खाते.
मला एक लहान भाऊ आहे. त्यामुळे भाऊबीजेला त्याला ओवाळण आणि त्याच्याबरोबर तो दिवस साजरा करते. दिवाळी खऱ्याअर्थाने माझ्यासाठी एक नवी ऊर्जा देणारा सण आहे. लहानपणापासून आकाश कंदील बनवणे, पणत्या रंगवणे आणि त्या प्रदर्शनात ठेऊन त्याची विक्री करणे हे परिस्थितीमुळे क्रमप्राप्त होत. मात्र आता हा छंदच बनला आहे. त्यामुळे दरवर्षी साधारणपणे महिना – दीड महिना आधी दिवाळीच्या वस्तूंची निर्मिती करण्याची लगबग सुरु होते आणि साधारणपणे दिवाळीच्या दहा दिवस आधी त्याच्या विक्रीसाठी आम्ही प्रदर्शन भरवतो. आकाशकंदील बनवणे, पणत्या रंगवणे ही कला मी जोपासली असली तरीही ती कला माझ्या आईकडून मला मिळली. लहानपणापासून मी आईला मदत करत आले आणि आजही तितक्याच उत्साहात आम्ही दिवाळीच्या तयारीत असतो.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *