माझी दिवाळी : श्रुतिका पावसकर

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

एरवी शूटच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असते. मात्र दिवाळी या सणाच्या निमित्ताने न कळत घरच्यांना अधिक वेळ दिला जातो. नाती आणि परंपरा यांची वेगळी सांगड घालणारा हा सण मला फार आवडतो. या दिवसांत एकूणच वातावरण खूप आल्हाददायक असतं. हवेत वेगळाच गारवा असतो. सगळीकडे नेत्रदीपक दिव्यांची रोषणाई असते.
सणाच्या काही दिवस अगोदर कुंभार वाड्यात जाऊन मातीच्या पणत्या, दिवे आणण्याचा काम मी न चुकता करते. नंतर त्यांना रंगवणे हा माझा आवडता छंद. याशिवाय मला रांगोळी काढायलाही खूप आवडते. मात्र, मला फटाके उडवणे पटत नाही त्यामुळे मी कधीच फटाके उडवत नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून मी न चुकता देवळात जाते. सणाच्या निमित्ताने पारंपारिक साड्या नेसायची हौसही या दिवसांत पूर्ण होते. दिवाळी आणि फराळ हे समीकरण जरी असल तरीही मला फराळ तसा फारसा खायला आवडत नाही पण आईच्या हातचे गूळ घालून केलेले मुगाचे लाडू खूप आवडतात. भाऊबीजेच्या दिवशी घरी सगळे नातेवाईक जमतात त्या निमित्ताने भेटी – गाठी होतात आणि त्यातून नात्यांली ओढ अधिकच घट्ट होते.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “माझी दिवाळी : श्रुतिका पावसकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *