माझी दिवाळी : तेजा देवकर

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

लहानपणी माझा हट्ट असायचा आणि म्हणून आम्ही फटाके आणायला जायचो. फटाके किती? तर इतके कि संपूर्ण कारची इंच आणि इंच जागा व्यापेपर्यंत मी फटाके घ्यायला लावायचे. त्यातही ड्रायवर सीटवर बसलेल्या व्यक्तींच्याही मांडीवर पायाजवळ फटाके असायचे. मग संपूर्ण दिवाळी हे फटाके फोडायचे हा माझा छंद होता. मात्र, साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी या सणाचं स्वरूपच माझ्यासाठी बदललं. आमच्या घरी दोन लाडके पाळीव कुत्रे आम्ही आणले आणि त्या वर्षांपासूनया सणाकडे किंबहुना फटाक्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच माझा बदलला. फटाक्यांमुळे पाळीव प्राण्यांना – कुत्र्यांना खूप त्रास होतो. कर्णकर्कश आवाज, प्रदूषण यामुळे ते आजारी पडतात आणि म्हणून या दिवसात जितकं होईल तितकं मी त्यांच्यासोबत असते. अगदीच महत्वाचं काम असेल तरच मी दिवाळीत बाहेर पडते. दिवाळी हि पारंपरिक पद्धतीने साजरी केली तर त्याचा मुक्या प्राण्यांना त्रास होत नाही आणि म्हणून मी फटाके फोडणे बंद केले. पारंपरिक पद्धतीने घरात विद्युत रोषणाई करून त्यातही मातीच्या पणत्या लावून मी संबंध घर कस उजळेल हे पाहते. दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुक्या प्राण्यांना होणारा त्रास याची जाणीव सर्वसामान्यांना करून देऊन त्याबाबतची जनजागृती मला जिथे कुठे देता करता येईल ती मी करत असते.
दिवाळीत पारंपरिक वेशभूषा करणे, हातात बांगड्यांचा चुडा घालणे आणि त्याला शोभेसा शृंगारकरणे हा देखील या दिवसातला माझा आवडता छंद. या दिवाळीच्या दिवसांत मी नातेवाईकांना भेटते. त्यांच्यासोबत फिरायला जाणे, जेवणे हा देखील ठरलेला कार्यक्रम. मला भाऊ नाही. पण लहान बहीण आहे. लहानपणी भाऊ नाही म्हणून भाऊबीज वा रक्षाबंधनाला थोडी चीडचीड व्हायची. मात्र सहावीत असताना आईने राखी आणून दिली आणि ती बहिणीला बांधायला सांगितली. त्या दिवसापासून या दिवसाचं वेगळं महत्व आमच्या आयुष्यात आहे. मी मोठी आहे आणि म्हणून मी तिच्यासाठी दरवर्षी भाऊबीज वा रक्षाबंधनाला तिला भेटवस्तू पाठवते. आमच्यात मी मोठी म्हणून मी तिचा भाऊ आणि ती माझी बहीण असं नातं आहे. हा सण आमच्या दोघांसाठी एक पर्वणीच ठरतो.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *