‘जाऊ दे न व’ एक वर्ष पूर्ण !

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

टीम लवंगी मिरची

एका आई आणि मुलाची प्रेमळ – भावनिक गोष्ट सांगणारा नाळ हा चित्रपट. अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या या सिनेमाला आज म्हणजेच १६ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या सिनेमाबाबत लक्षात राहण्याजोगं बरच काही होत. मात्र यातल्या ‘जाऊ दे नवं’ हे गाणं विशेष लक्षात राहीलं. तर चैतूच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर झळकलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने रसिकांची मनं जिंकली. या सिनेमामुळे श्रीनिवास प्रसिद्धीच्या चांगलाच झोतात आला आणि तो पुढे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.


‘नाळ’ या सिनेमाने अनेक पारितोषिकांवर आपली मोहर उमटवली. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावेळी ‘नाळ’ सिनेमाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. तर या चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला.

झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी ‘नाळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.


नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासला खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्याचे पालक खूप खूश आहेत आणि त्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याने अभिनय क्षेत्रातच करियर करावे, अशी त्यांची इच्छा आहे. श्रीनिवास पोकळे मूळचा अमरावतीचा असून तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे. श्रीनिवासने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नाळ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले की, नाळ चित्रपटाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. शूटिंगसाठी आम्हाला सहा वाजता उठायला लागायचे. नदीच्या पाण्यात शूटिंग होते. ऐन थंडीत पाण्यात उतरावे लागायचे. नाळमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची मला आता खूप आठवण येते.

नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासने राजकुमार आणि सुधाकर रेड्डी जॉर्ज रेड्डी नावाचा एक तेलुगु चित्रपट केला आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून यात त्याने मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्याने तेलुगु भाषेचे धडेदेखील गिरविले असल्याचे समजते.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *