शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली.   यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे १०० वे वर्ष आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांचे अर्ज आले होते. नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या चर्चेनंतर पटेल यांच्या नावाला एकमताने पंसती देण्यात आली. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने विक्रमी प्रयोग झाल्याचे पाहायला मिळाले होते.  

संबंधित बातम्या

‘जाऊ दे न व’ एक वर्ष पूर्ण !

मराठीसह हॉलिवूड कलाकारांनी एकत्र साकारला ‘रिमेम्बर एम्नेशिया’


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *