प्रत्येक भारतीयाने पाहावा असा ‘निथळत्या राती’ !

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

रोमँटिक अल्बममधून अलगद उलगडणार नातं !

प्रत्येक नात्याने अनुभवलेले कधी सुखद तर कधी विरहाचे तर कधी गमतीचे क्षण अगदी सहजपणे मात्र तितक्याच कल्पकतेने मांडत एएमइ म्युजिकने प्रत्येक भारतीयाला रोमँटिक अल्बममधून दिवाळीची अनोखी भेटच दिली आहे. या अल्बमचा टीजर आणि प्रोमो नुकताच एएमइ म्युजिकच्या ‘AME MUSIC INDIA’ या ऑफिशिअल युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमधून हा अल्बम म्हणजे भारतीय जवान आणि त्याची पत्नी यांच्या नात्यांतले विविध पैलू हळुवारपणे उलगडणारा रोमँटिक अल्बम असल्याचे समजते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर २८ ऑक्टोबर हे प्रेमगीत एएमइ म्युजिक प्रदर्शित करणार असल्याने टीजर आणि प्रोमोनंतर रसिकांची उत्कंठा ताणून धरण्यात त्यांना यश आलं आहे.


निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दापोली आणि त्यातच गुहागर, दाभोळ या नयनरम्य परिसरात ‘निथळत्या राती’चं संपूर्ण चित्रीकरण झालं आहे. संकेत लोंढे आणि मालविका गायकवाड यांच्या गोड जोडीचा ताकदीचा अभिनय, गायिका आनंदी जोशी यांचा जादुई आवाज तर आवाजाच्या जोडीला मिळालेली विजय तांबे यांच्या सुरेल्या बासरीची साथ, गीतकार साहस साखरे यांनी अलगद गुंफलेली शब्दरचना, संगीतकार शशांक प्रतापवर यांचं बेधुंद करणार संगीत, गायन आणि वाद्य या दोहोंचा अनोखा मिलाफ साधणारे संगीत संयोजक निलेश डहाणूकर, कल्पकतेच्या कॅन्व्हासमध्ये रंगांची अमाप उधळण करत दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी साकारलेला नेत्रदीपक दृश्यमय सादरीकरण.. या साऱ्या ताकदीच्या टिमवर्कने साकारलेला ‘निथळत्या राती’ हा अल्बम केवळ युट्युबचा कन्टेन्ट न राहता तो त्यापलीकडे रुपेरी पडद्याच मोहोळचं उभ करण्यात यशस्वी झाला आहे.


भारतीय जवान आणि त्याची पत्नी यांच्या नात्यांतला ओलावा संपूर्ण प्रोमोमध्ये कायम राखण्यात आला असल्याने हे नातं केवळ भारतीय जवान आणि त्याची पत्नी यांच्यापुरतीच मर्यादित न राहता तो बघणाऱ्याला आपला वाटू लागतो इतका भावनिक करण्यात आला आहे. मराठी इंडस्ट्रीत गेले दशकभर विविध भूमिकांतून सहज वावरणारा संकेत लोंढे याने या रोमँटिकगीतात भारतीय जवानाची भूमिका साकारली आहे. उंचपुरा, कसलेली शरीररचना यामुळे संकेतने भारतीय जवानाच्या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे. तर मुळशी पॅटर्न फेम मालविका गायकवाड हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर आपल्या कलेची वेगळी मोहोर उमटवली आहे. प्रोमोमध्ये दिसलेला मालविकाचा गोंडस चेहरा, पारंपरिक वेशभूषा आणि गीताच्या एका वळणावर तिचा दाखवलेला मराठमोळा शृंगार या सगळ्यातून मालविकाची एक वेगळीच ओळख प्रेक्षकांना करून देण्यात ती यशस्वी झाली आहे.


तुला पहाते रे या मालिकेच्या यशानंतर दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी साकारलेल्या ‘निथळत्या राती’ या कलाकृतीत त्यांच्या प्रतिभा संपन्नतेचं वेगळंच रूप पाहायला मिळालं असून या अल्बममध्ये असलेल्या छोट्या छोट्या तपशिलातून त्यांचा या विषयाचा अभ्यास दिसून येतो. पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र आलेल्या संकेत लोंढे आणि मालविका गायकवाड यांची केमिस्ट्री सहज आणि तितकीच रंजक दिसण्यामागे दिग्दर्शक चंद्रकांत हे यश्वस्वी झाले आहेत.

साधारणपणे एक वर्ष आधी ध्वनी मुद्रित झालेलं गाणं आपल्या कल्पकतेच्या जोरावर नव्याने उभारून त्याच प्रेमळ रुपडं घडवण्यामागे चंद्रकांत आणि त्यांच्या टीमचं विशेष कौतुक करायला हवं. तर या रोमँटिक अल्बमच्या प्रोमोच्या काही सेकंदात बघणाऱ्याला आपल्या आठवणीत रमायला भाग पडायला लावणं हेच या अल्बमचं खर यश मानता येईल. एएमइ म्युजिकच्या ‘AME MUSIC INDIA’ या ऑफिशिअल युट्युबवर ‘निथळत्या राती’च संपूर्ण गाणं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याने हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल अशी आशा निर्मात्यांना आहे.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *