मराठीसह हॉलिवूड कलाकारांनी एकत्र साकारला ‘रिमेम्बर एम्नेशिया’

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मराठी चित्रपटसृष्टी आणि हॉललीवूड या दोन्ही इंडस्ट्रीतले कलाकार आता एका सिनेमानिमित्त एकत्र येणार आहेत. येत्या २२ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं नाव आहे ‘रिमेम्बर एम्नेशिया’. भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर आणि दिग्दर्शक डॉ. रवी गोडसे यांनी हा सिनेमाचं लिखाण आणि दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचं भारतातील शूटिंग काही महिन्यांपूर्वी संपलं असून आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता संपूर्ण सिनेइंडस्ट्रीलालागली आहे.


मोजक्या मराठी कलाकारांना हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मराठीतल्या अनेक कलाकारांचा हॉलिवूडमधला श्रीगणेशा होणार असून त्यासर्वांसाठी हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या सिनेमात श्रुती मराठे, दीलिप राव, विजय पाटकर, महेश मांजरेकर, मोहन अगाशे, मेधा मांजरेकर, जयवंत वाडकर, लोकेश गुप्ते, आनंद काळे हे मराठी कलाकार आपला कसदार अभिनय सादर करणार आहेत. तर यांच्या जोडीला टोवा फेल्डशुह, लिसा एन वॉल्टर, कर्टिस कुक या हॉलिवूड कलाकारांची महत्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे.


अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टरची भारत भेटीदरम्यान झालेल्या अपघातात स्मृती जाते आणि काही दिवसांनी त्याची स्मृती परततेही. यानंतर मात्र आपणच पत्नीचा खून केलाय हे त्याला आठवत नाही. अशा वेगळ्या कथानकावर ‘रिमेम्बर एम्नेशिया’ हा चित्रपट आधारलेला आहे.
या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाली यासाठी अभिनेत्री श्रुती मराठेनेही आनंद व्यक्त केला आहे. फार कमी वेळा एकाच चित्रपटात अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते. या चित्रपटात तर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारही पाहायला मिळाले. प्रत्येकाचा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा होता, प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं होतं अशा शब्दात श्रुती मराठेनं आपलं मनोगत व्यक्त केलं.


रवी गोडसे सारख्या दिग्दर्शकासोबत काम करताना आनंद झाला. त्यांनी या चित्रपटाद्वारे तीन चित्रपटसृष्टींना एकत्र आणलं. आतापर्यंत कधीही न साकारलेली भूमिका निभावण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्तानं मला मिळाली. ही भूमिका आव्हानात्मक होती, मात्र कलाकार म्हणून ती खूप काही शिकवणारी होती असं कौतुक महेश मांजरेकर यांनी केलं आहे.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *