ZOL ZAAL : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘झोल झाल’

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मराठी सिनेसृष्टीत अनेक मजेदार, विनोदी चित्रपट येत आहेत. यात आणखी भर टाकत, पुढील वर्षात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘झोल झाल’ नावाचा एक धमाल चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. खरे तर या चित्रपटाच्या नावातच सारे काही सामावले आहे. चित्रपटाच्या नावावरून हा सगळा खटाटोप पोस्टरवर दिसणाऱ्या महालासाठी असणार, असे प्रथमदर्शी तरी दिसतेय. असे असले तरीही हा झोल काय असणार, हे मात्र चित्रपट आल्यावरच कळेल. युक्ती इंटरनॅशनल प्रस्तुत ‘झोल झाल’ या चित्रपटाचे निर्माता गोपाळ अग्रवाल आणि आनंद गुप्ता असून चित्रपटाच्या सहनिर्मात्यांची धुरा सारिका ए. गुप्ता, संजना जी. अग्रवाल यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून रश्मी अग्रवाल आणि स्वप्नील गुप्ता यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मानस कुमार दास यांनी केले असून चित्रपटाची कथा, पथकथा आणि संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांचे आहेत. मे २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कोणते चेहरे दिसणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. एवढे मात्र नक्की, की ‘झोल झाल’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार आणि भन्नाट पाहायला मिळणार आहे.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *